नागपूर : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’,अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. याआधी देखील कंगनाने अनेक असे बेताल वक्तव्य केले आहे, त्यामुळे आता कंगना राणावतवर मनोरुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.
‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरून संपूर्ण देशातून तीव्र पडसाद उमटत आहे. यानंतर आता कंगना विरोधात विविध भागात गुन्हा दाखल करण्यात आले. आता पुण्यात देखील तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच देशभरातील विविध भागात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच कंगनाच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे देखील संतप्त झाले आहे. याबाबत ते म्हणाले, ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अवघ्या 23 व्या वर्षी फासावर गेलेले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. हे स्वातंत्र्य सैनिक आणि देशाचा अपमान करणारे आहे. ज्यांनी हे विधान केल आहे, त्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं, असे देखील अमोल कोल्हे यांनी कंगनाला सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…
- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे कामगारांनीच सांगावं- अनिल परब
- …त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले- झिशान सिद्दिकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

