🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे १४ एप्रिलपासून राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व दुकानांना यात सूट देण्यात आली असून नागरिकांनी अतिमहत्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मात्र, नागरिक कोणतेही कारण देऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. मागील टाळेबंदी काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासह पोलीस लाठ्यांचा प्रसाद देखील देत असल्याचं समोर आलं होतं. वारंवार आवाहन करून देखील नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचे दिसून आल्यानेच पोलिसांना कठोर पाऊल उचलावे लागत असते.
दरम्यान, यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल वेगळं मत निर्माण होत असल्याचे देखील दिसून आल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांशी संवेदनशीलपणे वागावे, अशा सूचना दिल्या आहेत. यासोबतच, नागरिकांनी देखील कठोर नियमांचं पालन करावं, असं दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र


