Share

मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.

भारतात कोरोनाचा झालेला विस्फोट पाहता अनेक देशांनी भारतातून प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. यातच, ऑस्ट्रेलियाने देशात येण्यापूर्वी 14 दिवसांपूसून भारत राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या स्वदेशागमनावर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. तसेच, या निर्बंधांचे पाल केले नाही, तर पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा अथवा मोठा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

ऑस्ट्रेलियन आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतात संक्रमित झाल्यानंतर परतलेले अनेक लोक ऑस्ट्रेलियात आयसोलेशनमध्ये आहेत. यामुळेच, हे संक्रमण ऑस्ट्रेलियात पसरण्यापासून रोखण्यासाठी, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर या निर्णयावर 15 मेला सुधारणेसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!