आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारने या सामन्यात आरसीबीचे महत्वाचे फलंदाज विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केले. एकाच आयपीएल सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स या दोन्ही फलंदाजांना बाद करणारा हरप्रित केवळ सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. हरप्रितपुर्वी हा कारनामा श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, कृणाल पंड्या, नितीश राणा, राशिद खान आणि सुनील नरिन यांनी केला आहे. श्रेयस गोपाळने तर ही कामगिरी तब्बल तीन वेळा केली आहे. या यादीत आता हरप्रीत ब्रारने देखील स्थान मिळवले आहे.
या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या हरप्रित ब्रारने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. या सामन्यात त्याने प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा कर्णधार के एल राहुलसोबत महत्वाची ६१ धावांची नाबाद भागीदारी केली. यावेळी त्याने १७ चेंडुत १ चौकार आणि २ षटकारासह २५ धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी करताना त्याने आरसीबीचे महत्वाचे तीन खेळाडू कोहली, मॅक्सवेल आणि एबी यांना बाद करत आरसीबीला बॅकफुटवर ढकलले.
कोहली आणि डिव्हिलियर्सला एकाच आयपीएल सामन्यात बाद करणारे फिरकी गोलंदाज
१) श्रेयस गोपाळ (तीन वेळा)
२) हरभजन सिंग
३) कृणाल पंड्या
४) नितीश राणा
५) राशिद खान
६) सुनील नरिन
७) हरप्रीत ब्रार
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट
- महाराष्ट्र दिनानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या अनोख्या शुभेच्छा…
- एकाच षटकात ५ चौकार मारत ख्रिस गेलने आरसीबीविरुद्ध नोंदवला ‘हा’ विक्रम
- मोठी बातमी : रेमडेसिविरच्या ४.५ लाख कुप्या केंद्र सरकार करणार आयात
- नकोलस पुरनच्या फ्लॉप कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


