Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट

Published On: 

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे लोक इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण भटकत आहेत.तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी अचानकच गुरुद्वारा शीसगंज साहेब येथे भेट दिली. गुरु तेग बहाद्दर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने पूजा करत या ठिकाणी श्रद्धासुमने अर्पण केली. कोणताही सुरक्षा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेशिवायच पंतप्रधानांनी या ठिकाणाला भेट दिली.

शिखांचे नववे श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या कार्याक्रमात मोदी पोहोचले. असंही सांगण्यात येत होतं की, श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी हे श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या स्मारकाचं लोकार्पण करतील. या स्मारकात गुरुंनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची माहिती असेल. सेंट्रल वर्जवर 40 फूट उंची 45 फूट रूंदी इतका या स्मारकाचा आकार आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून मोदी ज्या वेळी गुरुद्वारामध्ये आले, त्यावेळी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही या ठिकाणी लावण्यात आले नव्हते. गुरुद्वारामध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गुरु तेग बहाद्दर यांनाही श्रद्धासुमनं अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण श्री शीशगंज साहेब गुरुद्वारा येथे भेट दिल्याचे सांगितले आहे. सोबतच काही छायाचित्रही त्यांनी पोस्ट केली.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!