Share

‘कोरोनाच्या संकटात सरकार मदत करू शकत नाही,मला आमदार असण्याची लाज वाटतेय’

Published On: 

नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये करोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यातच आता दिल्लीतील माटिया महल विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शोएब इकबाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब इकबाल यांनी दिल्लीतली परिस्थिती किती भीषण आहे याचे वर्णन केले आहे.

शोएब इकबाल या व्हिडीओ मध्ये म्हणतात, “आज मला दिल्लीची परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप येत नाहीये. लोकांना दिल्लीत ऑक्सिजन मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीयेत. माझा मित्र यावेळी दिल्लीच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात तडफडतो आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे ना व्हेंटिलेटर आहे.

रात्रीपासून माझ्याकडे औषधांची चिठ्ठी आहे. मी त्याला कुठून रेमडेसिविर आणून देऊ? देव करो आणि त्याचं काही बरं-वाईट न होवो. मुली रडत आहेत. सगळं आहे, पैसा आहे पण त्याला औषधं मिळत नाहीयेत. ऑक्सिजन मिळत नाहीये”, असं शोएब इकबाल या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

“मला आज आमदार असण्याची लाज वाटत आहे. आम्ही कुणाच्या मदतीला उपयोगी पडू शकत नाहीयेत. सरकार मदत करू शकत नाहीये. मी ६ टर्म आमदार आहे. दिल्लीतला सगळ्यात ज्येष्ठ एकच आमदार आहे. पण त्यानंतरही कुणी ऐकणारं नाही. कुणाला संपर्क करायचा? कोण नोडल अधिकारी आहे कळत नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे की दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. दिल्लीत फार गंभीर परिस्थिती आहे. असं झालं नाही तर रस्त्यांवर प्रेतं दिसू लागतील”, असं देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देशात कालही कोरोना बाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ चिंताजनक होती.काल सकाळी देशात 3 लाख 86 हजार 452 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली,बरे झालेल्या रुग्णांची संख्या त्याहून बरीच कमी, 2 लाख 97 हजार 540 होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या जवळपास 1 लाखानं वाढली.कोविड 19 मुळे 3 हजार 498 रूग्ण दगावल्याची नोंद काल झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!