कराची – दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली.
Shocked by the horrific train accident at Ghotki early this morning leaving 30 passengers dead. Have asked Railway Minister to reach site & ensure medical assistance to injured & support for families of the dead. Ordering comprehensive investigation into railway safety faultlines
— Imran Khan (@ImranKhanPTI) June 7, 2021
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर सय्यद एक्सप्रेस रेल्वे (लाहोर ते कराची) ही रुळावरून घसरल्यानंतर सरगोधाकडे जाणारी मिल्लट एक्स्प्रेसवर ती धडकली. यामुळे मिल्लत एक्सप्रेसचे डबे पलटी झाले. हा अपघात घोटकी जिल्ह्यातील धरकी शहराच्या जवळ घडला.
At least 30 people died and several sustained injuries as Sir Syed Express train collided with Millat Express between Reti and Daharki railway stations in Ghotki, reports Pakistan's ARY News
— ANI (@ANI) June 7, 2021
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. यावेळी परिसरातील गावकरीही पोलिसांच्या मदतीला धावून आले. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकऱ्यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अपघातांचं कारण नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- स्टार टेनीसपटू रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

