रोसेऊ : पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहे. डोमिनिका येथील उच्च न्यायालयात मेहुल चौक्सीला केलेल्या अटकेसंदर्भात खटला सुरू आहे. यावरील सुनावणीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मेहुल चोक्सीने अजब दावे केले आहेत. मी कायदा पाळणारा व्यक्ती असून, उपचारांसाठी भारत सोडला होता, असे मेहुल चोक्सीने म्हटले आहे.
मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक झाली आहे. त्यानंतर चोक्सीने डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्जही दाखल केला आहे. मात्र, न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे भारतानेही मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशी प्रक्रियेला वेग दिला आहे.
पोलीस कोठडीत राहणे माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मी 62 वर्षांचा असून मला मधुमेहाबरोबरच अन्य आजार आहेत. माझ्या जामिनासाठी कोर्टाला मोठी रक्कम हवी असेल तर ती मी भरू शकतो. तसेच डोमिनिकामधील माझ्याविरोधातील खटला संपेपर्यंत मी हा देश सोडणार नाही याची हमी देतो, त्याचबरोबर माझ्या राहण्याचा आणि सुरक्षेचा सर्व खर्च करण्यास मी तयार असल्याचे मेहुल चोक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- स्टार टेनीसपटू रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार
- …लोकांना हात जोडून विनंती करतो, मेहेरबानी करा; खासदार उदयनराजे भोसलेंचं आवाहन !
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

