मुंबई : नाओमी ओसाका नंतर रॉजर फेडररने फ्रेंच ओपनमधुन माघार घेतली आहे. स्विझर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर फ्रेंच ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पोहोचला आहे. मात्र चौथी फेरी खेळण्यापुर्वीच त्याने माघार घेतली आहे. आगामी काळात दुखापतीचा धोका टाळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.
फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेत फेडररने तिसऱ्या फेरीत डॉमनिक कोफरला ७-६(५), ६-७ (३), ७-६(४), ७-५ असा चार सेटमध्ये पराभूत केले होते. हा सामना मध्यरात्रीपर्यंत चालला होता. या सामन्यानंतर फेडररने माघार घेण्याचे संकेत दिले होते. काही दिवसापुर्वी फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. शस्त्रक्रियेनंतर तो गेल्या वर्षभरापासुन संघर्ष करत आहे. या काळात तो अनेक महिने टेनिसपासुन दुर होता. अखेर रविवारी ६ जुन रोजी फेडररने ट्विट करत फ्रेंच ओपन मधुन माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. या ट्विटमध्ये ‘शस्त्रक्रियेनंतर दुखापतीतून सावरण्यासाठी स्वत:वर जास्त दबाव टाकणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी माझ्या टीमसोबत चर्चाकरुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे फेडरर म्हणाला आहे.
— Roger Federer (@rogerfederer) June 6, 2021
यावेळी फेडररने या स्पर्धेतील तीन सामने खेळताना मजा आली आसे म्हणाला. जागतीक स्तरावर २०ग्रॅंडस्लॅम जिंकलेल्या फेडररला फ्रेंच ओपन मध्ये एकच विजेतेपद पटकावता आले. २००९ साली त्याने हे विजेतेपद पटकावले होते. फेडररने आतापर्यंत ९ वेळा विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर अमेरीकन ओपनमध्ये ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …लोकांना हात जोडून विनंती करतो, मेहेरबानी करा; खासदार उदयनराजे भोसलेंचं आवाहन !
- ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य; अमित देशमुख यांची काळजी घेण्याची ग्वाही
- विजांच्या कडकडाटात पावसाने शहराला धुतले; सखल भागात साचले पाण्याचे तळे
- पुणेकरांना दाखवलेले चोवीस तास पाण्याचे गाजर नेमकं पुर्ण करणार कोण ?
- महाराष्ट्रात आज १२,५५७ कोरोना रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर


