नागपूर – देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आता काहीप्रमाणात नियंत्रित करण्यात यश येताना दिसत आहे. लसीकरण मोहीम देखील मोठ्याप्रमाणावर राबविली जात आहे. यात आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीची चाचणी 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवर करण्यासाठी, नमुना परीक्षणाला राज्यात कालपासून नागपूर इथे प्रारंभ झाला.
या परीक्षण कार्यक्रमाचे प्रमुख बालरोगतज्ञ डॉक्टर वसंत खळतकर यांनी सांगितलं की नमुना पाहणीसाठी शंभर मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी 50 जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात येणार असून 28 दिवसांनी दुसरी मात्रा दिली जाणार आहे. यानंतर लसीच्या परिणामांचा तसंच प्रतिपिंड निर्मितीचा अभ्यास पुढील दोनशे आठ दिवस केला जाणार आहे.
दुसऱ्या बाजूला जगाला कोरोना महामारीच्या जंजाळात लोटणारा चीन आता या विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने गर्भगळीत झाला आहे. तिसरी लाट मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरेल हा तज्ञांचा इशारा लक्षात घेऊन चिनी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत 3 वर्षांपासूनच्या बालकांनाही सायनोवॅक कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे.
कोरोना लसीकरण केवळ 18 वर्षांवरील नागरिकांपर्यंतच मर्यादित असताना बालकांना ही लस देण्यास होकार देणारा चीन हा जगातील पहिला मोठा देश ठरला आहे.सायनोवॅक बायोटेक पंपनीचे चेअरमन येन विडोन्ग यांनी आज चीन सरकारच्या बालकांच्या लसीकरणाबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती सर्वांना दिली.
महत्वाच्या बातम्या
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- स्टार टेनीसपटू रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार
- …लोकांना हात जोडून विनंती करतो, मेहेरबानी करा; खासदार उदयनराजे भोसलेंचं आवाहन !
- पहिल्याच दिवशी केला ५० हजार पुणेकरांनी दिड महिन्यापासून बंद असलेल्या पीएमपी प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
