मुंबई : बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन ‘द बिग बुल’ या चित्रपटातून लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्याच्या चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ३ मिनिट ८ सेकंदाचा हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील अभिषेक बच्चनचा लूक आणि स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे. यात अभिषेक बच्चनला मिशा असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर या ट्रेलरमध्ये काही दमदार डायलॉग ही ऐकायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ‘इस देश मैं हम कुछ भी कर सकते है…’ असे बोलताना दिसत आहे. यासोबतच अभिषेक आणि इलियानाची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट १९९० ते २००० मध्ये भारतातील आर्थिक क्षेत्रात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेताच्या जीवनावर आधारित आहे.
https://www.instagram.com/tv/CMlewCXDxK-/?utm_source=ig_web_button_share_sheet
अभिषेक बच्चनची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. अभिषेक बच्चनला या व्यक्तिरेखेत पाहून प्रेक्षकांना गुरू चित्रपटाची भुमिका आठवली आहे. गुरू चित्रपटात अभिषेकने एका उद्योजकाची भुमिका साकारली होती. तसेच या चित्रपटात सूचित दलाल यांची भूमिका अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने साकारली असून यात ती डॅशिंग वाटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर! औरंगाबादला मिळणार आणखी ५० हजार लसींचा साठा
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; आता आठवलेही पाठवणार शाहांना पत्र
- अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
- धक्कादायक! तीन दिवसांपूर्वी लस घेतलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू
- विनयभंग करणाऱ्या भोेंदु बाबाचा जामीन अर्ज फेटाळला


