औरंंगाबाद : इलाज करण्याचा बहाण्याने आईसह मुलीचा विनयभंग करणा-या भोंदू बाबाने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला. साईनाथ कारभारी गुंजाळ (वय ५५, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे भोंदू बाबाचे नाव आहे.
प्रकरणात ३० वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीच्या मुलीला उलट्या व पोटाचा त्रास होत असल्याने त्यांनी अनेक दवाखाने करुनही त्रास थांबत नव्हता. तेंव्हा अनेकांनी त्यांना घृष्णेश्वर कॉलनीतील साईनाथ महाराजांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानूसार फेबु्रवारी २०२१ रोजी फिर्यादीही कुटूंबासह साईनाथ महाराज कडे गेली. त्यानंतर मुलीच्या उलट्या थांबल्या. त्यामुळे फिर्यादीच्या कुटूंबाचा त्याच्यावरील विश्वास वाढला.
त्यामुळे सकाळ संध्याकाळ महाराज कडे जावू लागले. मात्र साईनाथ गुंजाळ यांनी संधी साधून फिर्यादीसह तिच्या मुलीचा देखील विनयभंग केला होता. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साईनाथ गुंजाळ यांना ७ मार्च रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. सुनावणीच्या वेळी सहायक अभियोक्ता मधुकर आहेर यांनी काम पाहिले.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


