Share

खुशखबर! औरंगाबादला मिळणार आणखी ५० हजार लसींचा साठा

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेला शहरातील सुमारे तीन लाख नागरिकांच्या लसीकरणाचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माझा वॉर्ड शंभर टक्के कोरोना लसीकरणयुक्त वॉर्ड हे अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. यासाठी महापालिकेला आणखी लसींची गरज असल्याने सोमवारपर्यंत ५० हजार लसींचा साठा शहरात दाखल होणार आहे.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून देशभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २५ हजार ९९१ जणांची लस घेण्यासाठी नोंद झाली. त्यानंतर १५ हजार १०५ फ्रंट लाईन वर्कर्सची नोंदणी झाली.

आता माझा वॉर्ड शंभर टक्के कोरोना लसीकरणयुक्त वॉर्ड हि मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेसाठी त्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींना देखील सहकार्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार लसीकरणासाठी दहा टीम तयार केल्या जात आहेत. या टीम कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन लसीकरण करतील. त्यामुळे पालिकेला लसीचा आणखी साठा आवश्यक आहे. सध्या पालिकेकडे कोविडशिल्डच्या ७ हजार ८०० तर कोव्हॅक्सिनच्या ३ हजार लसींचा साठा पडून आहे. सोमवारपर्यंत आणखी ५० हजार लस मिळतील, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरूवारी (दि.१८) सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!