Share

…अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही, व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकार विरोधात एल्गार

Published On: 

मुंबई : कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर सरकार दुकानदार आणि व्यापाऱ्यांना काय पॅकेज देणार, याबाबत घोषणा करावी. अन्यथा आम्ही लॉकडाऊनला जुमानणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.

जर राज्यातील दुकानं बंद राहणार असतील तर ऑनलाईन डिलिव्हरीही बंद ठेवा. ही सेवा सुरु राहिली तर आम्ही त्याला विरोध करु, असेही विरेन शाहा यांनी म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!