Share

लस घेतल्या नंतर देखील होतो कोरोना; सिरमच्या पूनावालांनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

पुणे: गेल्या वर्षभरापासून जगासह देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. गेल्या वर्षी करुणा विरुद्ध लढण्यासाठी कोणताही योग्य उपचार उपलब्ध नव्हता मात्र यावर्षी कोरोना प्रतिबंधक लस आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र अनेक रुग्णांना करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही करोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे लोकांच्या मनातल्या लसी बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. यावर विविध तज्ञांकडुन विश्लेषण देखील करण्यात आल आहे. त्याचबरोबर आता स्वतः सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनीच स्पष्टीकरण देऊन नागरिकांच्या मध्ये असलेल्या या संभ्रमाला दूर केले आहे.

एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनावाला यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीचे नाव कोव्हिशिल्ड आहे. या लसिमुळे तुम्हाला आजार होण्यापासून वाचवू शकत नाही. मात्र ही लस म्हणजे एक प्रकारचे बुलेटप्रुफ जॅकेट असल्यासारखे आहे. गोळी लागल्यानंतर बुलेटप्रुफमुळे माणूस मारत नाही. मात्र तुम्हाला थोडेफार ड्यामेज होऊ शकते. त्यामुळे लस घेतल्याने तुम्हाला जास्त त्रास होणार नाही अथवा तुमचा मृत्यू होणार नाही. सोबतच, ही लस घेतल्यानंतर तुम्हाला 95% केसेस मध्ये रुग्णालयात भरती होण्याची गरज लागणार नाही. असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!