नाशिक : ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. क्रेडाई संस्थेच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असून आपण उपाय योजना करत असतांना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खाजगी डॉक्टर, नर्स, परिचारिका यांनी कामासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पत्रकार दातीर हत्या प्रकरणाला धक्कदायक वळण, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्यावर आरोप !
- उस्मानाबाद; भरधाव कार घुसली हॉटेलात, दुकाने बंद असल्याने मोठा अनर्थ टळला!
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे का ?, सगळ्यांची ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती घ्या”
- CSK-DC सामन्यात दोन भावांमध्ये झाली काटे की टक्कर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

