Share

पराभवाचे धोनीने सांगितले कारण, म्हणाला…

Published On: 

चेन्नई : ऋषभ पंतच्या  कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं  या आयपीएल सिझनची सुरुवात यशस्वी केली आहे. दिल्लीनं महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा सात विकेट्सनं पराभव केला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली. यानंतर धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली.

पराभवानंतर धोनी सांगितले कारण म्हणाला, पहिल्या मॅचमधील पराभवानंतर बॉलर्सनी धडा घ्यायला हवा, असं मत धोनीनं व्यक्त केलं आहे. “बॉलर्सनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलं नाही. त्यांनी खराब बॉलिंग केली. त्यांनी या पराभवानंतर धडा घेतला आहे. आता ते पुढील मॅचमध्ये चांगली कामगिरी करतील, “ड्यूवर बरंच काही अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही जास्त रन करायला हवे होते.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!