अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३६५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१ हजार ३७५ एवढी झाली असून आत्तापर्यंत ४७ हजार २९६ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७८९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे एक जणांचा मृत्यू झाला नाही.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २२१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, जामखेड ४, कर्जत ३, नगर ग्रामीण ३, नेवासे ८, पारनेर २, श्रीगोंदा २१, मिलिटरी हॉस्पिटल ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३०, अकोले १, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासे ५, पाथर्डी २, राहाता ५, राहुरी २, संगमनेर १, शेवगाव ६, श्रीगोंदे १, श्रीरामपूर ५, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २७, अकोले १०, जामखेड १९, कर्जत १९, कोपरगाव १३,नगर ग्रामीण २, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, राहाता १३, राहुरी २, संगमनेर २८, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला ‘हा’ सवाल
- ”राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून धक्का बसला ”; पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र
- इंदुरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी कानगोष्टी; चर्चांना उधाण
- दुसऱ्यांची उणी काढण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातील गोष्टी निस्तराव्यात : राणे
- दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रात उघड झाली ही गुपिते!


