🕒 1 min read
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली. बार, रेस्तराँ आणि समुद्रकिनारे खुले होतात. पण, दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे, असा उपरोधिक टोला राज्यपालांनी लगावला.
राज्यपालांच्या पत्राला हिंदुत्वाला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे.
‘मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणं म्हणजे धर्मनिरपेक्ष असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही का?,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.
दरम्यान, आता या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील उडी घेतली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.
It was brought to my notice through the media, a letter written by the Hon. Governor of Maharashtra to the @CMOMaharashtra
In this letter the Hon. Governor has sought the intervention of the Chief Minister to open up religious places for the public. pic.twitter.com/1he2VOatx3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2020
“राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
