अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात झाला.
या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज थेट व्यासपीठावर जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जाऊन भेटताना दिसले. यावेळी त्यांनी फडणवीस, पाटील यांच्याशी काही मिनिटे संवादही साधला. यानिमित्ताने या भेटीची चर्चा सुरू झाली असून त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
पद्मभूषण मा.खा.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्र प्रकाशन कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, हरिभाऊ बागडे, शिवाजी कर्डिले, पोपट पवार, राजेंद्र विखे यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम संपल्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी थेट व्यासपीठावर जात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काही मिनिटे कानगोष्टी केल्या. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मध्यंतरीच्या काळात फडणवीस यांच्या व्यासपीठावर इंदुरीकर महाराज दिसले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज हे भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, मी राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही, असे इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट केले होते. परंतु काल आवर्जून फडणवीस व पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला ‘हा’ सवाल
- ”राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून धक्का बसला ”; पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- दुसऱ्यांची उणी काढण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातील गोष्टी निस्तराव्यात : राणे
- शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर- बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

