Share

दुसऱ्यांची उणी काढण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातील गोष्टी निस्तराव्यात : राणे 

Published On: 

मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी राज्यपालांना केला होता.

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची विधानं असलेला २०१५ सालच्या  ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “सेक्युलरीझम संपलं आहे. कृपया भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा” या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली.

“यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा” असा सल्ला देत नितेश राणेंनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!