Share

दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रात उघड झाली ही गुपिते!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोणी (जि. नगर) येथे झाले. आपल्या हयातीतच त्याचे प्रकाशन व्हावे ही बाळासाहेब विखे यांची इच्छा होती. मात्र, प्रकृतीच्या कारणाने त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.

या चरित्रात स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक राजकीय गुपिते उघड केली आहेत. संगमनेरचे इतिहास अभ्यासक व राजकीय विश्लेषक संतोष खेडलेकर यांनी या पुस्तकाचे थोडक्यात विश्लेषण केले आहे.

या आत्मचरित्रात नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या काळे-कोल्हे यांच्या सहमतीच्या राजकारणाचे पदर विखेंनी खास आपल्या शैलीत उलगडले आहेत. अण्णासाहेब शिंदे आणि पी.बी.कडू पाटील यांच्याबद्दल काहीसे परखड भाष्य या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच वाचकांना उत्सुकता असलेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे.

शिवसेना का सोडावी लागली, शिवसेनेतील कोणत्या बड्या नेत्याला विखेंचा करिष्मा डोईजड वाटू लागला, याबाबतही त्यांनी परखड भाष्य केले आहे. या पुस्तकात जिल्ह्यातील नेत्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबद्दल लिहिलेलं आहे.

स्व.बाळासाहेब विखेंचे आत्मचरित्र म्हटले की, त्यात त्यांनी कुणावर शरसंधान केले असेल? त्यांनी कुणाबाबत चांगले लिहिले असेल व कोणाबद्दल वाईट लिहिले असेल, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. शरद पवार आणि विखे यांचे फारसे सख्य नसल्याचे मानले जात होते. पक्षाचे हायकमांड राजीव गांधींकडे शब्द टाकून शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यात स्व.विखे यांचाही वाटा असल्याची माहिती पुस्तकात मिळते.

पुस्तकातला आणखी खळबळजनक भाग म्हणजे बाळासाहेब विखे यांना जीवे मारण्याचे काही प्रयत्न झाले याचाही उल्लेख या पुस्तकात केलेला दिसत आहे. गडाख आणि विखे निवडणूक खटला हे प्रकरणही ह्या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!