Share

लालपरीच्या ६७८ बसेसच्या फेऱ्या रद्द

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. तर शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. नागरिकांना केवळ अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर जाण्यास मुभा असल्याने नागरिकांनी देखील शनिवारी बाहेर पडणे टाळले. त्यामुळे या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील आज तब्बल ६७८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या सर्व फेऱ्या जवळपास ७८,९४० किलोमीटर अंतराच्या होत्या. यासर्व रद्द करण्याची वेळी एसटी प्रशासनावर आज आली. यामुळे प्रशासनाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागल्याची माहिती आगर प्रमुखांनी दिली. परंतु कोरोना आटोक्यात येण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रशासनाला सर्वतोपरी मदत करणर असल्याचेही त्यांनी सांगितले.

रद्द झालेल्या फेऱ्यांची यादी –
औरंगाबादेतील मुख्य स्थानकातील १९,९७७ किमीच्या ११२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर सिडको स्थानकातील १६,०२० किमीच्या १२० फेऱ्या, पैठण येथील ६,९३७ किमीच्या १०४ फेऱ्या, सिल्लोड येथील ८,८४० किमीच्या ९० फेऱ्या, वैजापूर येथील ५,४८७ किमीच्या ३७ फेऱ्या, कन्नड येथील १०,०९८ किमीच्या १२४ फेऱ्या, गंगापूर येथील ४,५०३ किमीच्या ४० फेऱ्या, सोयगाव येथील ७,२२८ किमीच्या ५१ फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या.

या रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे लॉकडाऊन दर शनिवारी व रविवार कायम असल्याने लालपरीला अधिकच्या तोट्याला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!