Share

‘…लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत चक्क शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांची युती झाली आणि हे वृत्त राज्यभरात वाऱ्याच्या वेगाने पसरले. दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी युती केल्यामुळे अमरावती मनपाच्या या निवडणुकीची चर्चा राज्यभर रंगत आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी शिवसेना आणि एमआयएमच्या या युतीवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट करून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील दोन समविचारी पक्षांनी अमरावतीत युती करून निवडणुका लढवायच्या ठरवल्या आहेत… लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल…’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही जाणार !

एमआयएम पक्षाचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी या युतीबाबत भाष्य केलं आहे. ‘अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतची युतीची गोष्ट खरी आहे. पण स्थानिक पातळीवरील गणिते वेगळी असतात. यामध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही विषय नसतो. अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणे योग्य वाटले असेल, जेणेकरून विकासकामे करता येतील. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुणाशीही आघाडी करायची वेळ आली तर आम्ही नक्कीच ती आघाडी करण्यासाठी तयार आहोत. फक्त भाजप सत्तेत येऊ नये.’ असं जलील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!