Share

राज्यात आज कोरोना बाधितांचा आकडा वाढला; मात्र कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत.

राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांचा आकडा १० हजारांपार गेला आहे. आज राज्यात 10 हजार 107 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात 10 हजार 567 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,79,746 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.7 टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

राज्यात आज 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, आज नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!