Share

विदर्भवासियांना मरणानंतरही यातना; अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीपात्रातून न्यावा लागाला मृतदेह

Published On: 

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील महागाव या गावाला पूल नसल्याने पाण्यातून धोकादायकरित्या रस्ता ओलांडावा लागत आहे.  रस्ता ओलांडताना एका युवकाचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच ठिकाणाहून त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना तीन फुट पाण्यातून जावे लागले आहे.

शेगाव तालुक्यातील महागाव येथील उमेश महादेव डाबेराव या युवकाचा ११ सप्टेंबर रोजी नदीतील रस्त्यावरुन जाताना पाय घसरला होता. या अपघातात हा युवक गंभीर जखमी झाला होता. उमेश यांचे सोमवारी निधन झाले. स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्यातच ही नदी असल्याने अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना अक्षरश: तीन फुट पाण्यातून ही अंत्ययात्रा घेऊन जावी लागली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नदीपात्रातून अंत्ययात्रा

शेगाव तालुक्यातील महागाव आणि जवळा पळसखेड गट ग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावांमधून बोर्डी नदी वाहते. महागावातील सर्व व्यवहार, किराणा, दवाखाने आदी दुकाणा या जवळा पळसखेड या गावांत आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांना नेहमीच ही नदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात अनेकदा या गावाचा संपर्क तुटतो. अनेकदा तक्रारी करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून हा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!