Share

हार्दिक पंड्याची नव्हे तर ‘या’ खेळाडूची कामगिरी सामना जिंकवून देणारी : मूडी

Published On: 

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला 20 षटकांचा सिडनी येथे झालेला सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 195 धावांचे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. शिखर धवन 52, विराट कोहली 40 आणि हार्दिक पंड्याच्या नाबाद 42 धावांनी भारताचा विजय साकार केला.

दरम्यान, भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांनी मांडलेल्या एका मताची सध्या चर्चा सुरु आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत मूडी म्हणाले, ”हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र प्रतिस्पर्धी संघ १९४ धावा काढत असताना नटराजनने फक्त २० धावा देत पटकाविलेले २ बळी, ही माझ्या मते खऱ्या अर्थाने सामना जिंकवून देणारी कामगिरी होती.”दरम्यान,या मालिकेतला अखेरचा सामना 9 डिसेंबरला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!