🕒 1 min read
सेनापती कापशी :भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे, त्यामुळे आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आणि पर्यायाने शेतीचा विकास झाला पाहिजे असं मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.
हसूर बुद्रुक ता. कागल येथे स्वयंचलित ठिबकसह समर्थ कृषी पर्यटन केंद्र व अंकुर डिजिटल फार्म मॅनेजर या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग या कार्यक्रमात ते बोलत होते.जागतिक मृदा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटपही झाले.
मुश्रीफ म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था रुतली असताना फक्त कृषी क्षेत्रानेच या देशाला तारले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. पाण्याचा अतिवापर हा शेतीसाठी धोकादायक आहे. यामुळे जमीन नापीक होण्याची शक्यता आहे. याकरता शेतकऱ्यांनी स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा वापर करावा. याकरता अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.यंदा कोरोना, निसर्ग चक्री वादळ, महापूर, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटे आली. पण महाविकास अघाडी सरकार सातत्याने या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
मुश्रीफ म्हणाले, माझी नाव कागल-गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, सरसेनापती साखर कारखान्याचे जनरल मँनेजर संजय शा.घाटगे, अंकुर फार्मासिसचे गिरीश कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समन्यायी पाणी वाटपचे मुख्य प्रवर्तक आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, शशिकांत खोत,अंकुश पाटील आदीसह कारखान्याचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीवर मनापासून प्रेम…
वडिलांच्या मृत्यूनंतर पन्नास एकर शेतीची जबाबदारी माझ्यावर होती. शेतीमध्ये निर्भेळ आनंद मिळतो, मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे. शेतात मी वाकुरी मारलेली असून पाण्यासाठी नदीत खड्डेही खोदायचो. मी शेतीवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. दरम्यान; नाटक करण्यासाठी म्हणून मी शेताच्या बांधापर्यंत जात नसल्याचे सांगताना श्री. म्हणाले, अलीकडच्या काळात मला शेतात जाता येत नाही. माझ्या शेतीची जबाबदारी माझी पत्नी बघते.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- सिद्धार्थ हॉस्टेलची इमारत लवकरच उभारणार – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
