Share

कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर आता अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान,कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आज आणखी वाढून 94.37 टक्के झाला आहे. आज सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त आहे. देशातले सुमारे 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या 22 पट आहे.

गेल्या महिनाभरापासून दैनंदिन रुग्ण वाढही 50 हजारांच्या खाली नोंदवली जात आहे. काल दिवसभरात सुमारे 36 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली तर 42 हजार रुग्ण या आजारातून बरे झाले. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत असून सध्या ते प्रमाण 4.2 टक्के आहे.

सध्या देशभरात 4,03,248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या एकंदर बाधितांच्या केवळ 4.18 टक्के आहे. देशाचा कोविड मृत्यू दर सध्या 1.45 टक्के असून काल दिवसभरात या आजारामुळे देशात 482 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी करोना लस विकसित करण्यात येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. करोनावरील लस ही जादूची कांडी नसून करोनाचा संसर्ग पूर्णपणे संपणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र या लसीकरण दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा देखील महत्वपूर्ण आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!