Share

चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी 

Published On: 

मुंबई   – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदुमिल येथे भव्य स्मारक उभे राहणार आहे. त्याच पद्धतीने चैत्यभूमीचा विकास करून तेथे दीक्षाभूमी सारखा भव्य स्तूप उभारावा. सध्या चैत्यभूमीची वास्तू जुनी आणि थोडी कमकुवत झाली आहे. या वास्तूची डागडुजी केली जाते मात्र आता या वास्तूची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे सांगत चैत्यभूमी येथे भव्य स्तुप उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महावरीनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन सभेत ना रामदास आठवले यांनी केली. काल चैत्यभूमी स्मारकात सकाळी 8 वाजता ना रामदास आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.यावेळी राज्याचे राज्यपाल महामाहिम भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सह राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला.त्यांनी जगातील सर्वश्रेष्ठ ठरलेले भारताचे संविधान साकार केले.संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मीयांचे कल्याण केले आहे. देश एकजूट ठेवण्याच्या केंद्रस्थानी संविधान आहे. सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे होते. त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत ,संविधानातील भारत साकार करण्याचा निर्धार करू हेच खरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

दरम्यान रामदास आठवले यांच्या बांद्रा येथील संविधान निवासस्थानी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी ना रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले,पुत्र कुमार जित आठवले,बहीण शकुंतला आठवले,तसेच बौद्धचार्य प्रकाश जाधव,चंद्रशेखर कांबळे,घनश्याम चिरणकर स्वप्नाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!