Share

टोकीयो पॅरालिम्पिक! सुमित आंतिलचा सुवर्णवेध, लागोपाठ केली तीन विश्वविक्रमाची नोंद

Published On: 

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सात पदकाची कमाई केली होती. यानंतर २३ ऑगस्टपासुन सुरु झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची धडाकेबाज कामगीरी सुरुच आहे. यात भारतीय भालाफेकपटु सुमित आंतिलने तर कहरच केला आहे.

सोमवारी ३० ऑगस्ट रोजी झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारतीय भालाफेकपटु सुमित आंतिलले सलग तीन वेळा विश्वविक्रमाची नोंद केली. एफ ६४ क्लास भालाफेक स्पर्धेत सुमित आंतिलने पहिल्या प्रयत्नात ६६.९५ मीटर आंतरावर भाला फेकत विश्वविक्रमाची नोंद केली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ६८.०८ मीटर आंतरावर भाला फेकत पुन्हा नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.

यानंतर त्याने पाचव्या प्रयत्नात पुन्हा एकदा विश्वविक्रमाची नोंद करत ६८.५५ मीटर आंतरावर भाला फेकला. या प्रयत्नासह त्याने स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. काही दिवसापुर्वी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताच्या निरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. आता त्यांच्यानंतर पॅरालिम्पीकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदकाची कमाई झाली आहे. टोकीयो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने भालाफेक स्पर्धेत तीन पदके पटकावली आहे. देवेंद्र झझारियाला रौप्य, सुंदर सिंगला कांस्य पदक मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!