मुंबई: भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपकडून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन केले जात आहे. दरम्यान, पुणे,नाशिक,नागपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून नेत्यांकडून शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान आता यावरूनच कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
एकीकडे राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून उत्सवांवर बंदी घातली आहे. असे असताना भाजपाकडूनच राज्यात आंदोलन केले जात आहे. आता भाजप मोदीविरोधात आंदोलन करणार का, याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे अशी मागणी कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
शंखासूर भाजपा नेते मोदींविरोधात आंदोलन करणार का? सुपरस्प्रेडर भाजपा नेते हे कोरोनाचे कॅरिअर आहेत जनतेने त्यांच्यापासून दूर रहावे! pic.twitter.com/q55NnaXqu9
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 30, 2021
तसेच कोरोनाचे कुठलेही पालन भाजप नेते करत नाहीत. भाजपने आध्यात्मिक शब्दाचा विकृतीकरण केले आहे. हा हिंदू धर्मियांचा अपमान आहे. यांना भाविकांच्या आरोग्याचे काही देणेघेणे नाही. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आणण्यात भाजपने भूमिका बजावली आहे. तसेच उत्तराखंड येथे भाजप सरकार असताना कावड यात्रेस बंदी का घातली.असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- ‘समोर येऊन बघा.. मग बघू कसे सण साजरे होत नाहीत?’, मनसेचा थेट इशारा


