मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा डावाने पराभव करत मालिकेत दमदार पुनरागमन केले. यासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. यानंतर इंग्लंडने मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.
चौथ्या कसोटीसाठी अष्टपैलु ख्रिस वोक्सने इंग्लंडच्या संघात पुनरागमन केले आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. सलग होणाऱ्या कसोटी सामन्यामुळे इंग्लंडचा संघ गोलंदाजाना रोटेशन पद्धतीने खेळवण्याचा विचार करत आहे. यामुळे जेम्स अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी याबद्दल अद्यापही कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती दिली आहे.
मात्र अँडरसनने स्वत: भारताविरुद्ध सर्व सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेम्स अँडरसन जर चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला तर हे भारतीय संघाच्या पथ्यावर पडु शकते. कारण जेम्स अँडरसनने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह इतर फलंदाजाची डोकेदुखी ठरला आहे. तो जर संघाबाहेर गेला तर भारतीय संघाला त्याचा फायदाच होईल. मात्र अंतिम निर्णय सामना सुरु होण्यापुर्वीच समजेल.
महत्त्वाच्या बातम्या
- चित्रपटातील काही विशिष्ट सीन्स करतांना ‘जग्गुदादा’लाही वाटतेय ‘लाज’
- ‘मोदी सरकारनेच उत्सवांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले,’ आता मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का?
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

