मुंबई: बॉलीवूडचा डॅशिंग ‘दादा’ म्हणून परिचित असलेला लोकप्रिय अभिनेता जॅकी श्रॉफने सर्वांसमोर विशेष सीन्स करतांना लाजल्यासारखं होत असल्याचं मत व्यक्त केलयं. दमदार अभिनयाने अनेक सुपरहिट सिनेमे आपल्या नावे करणाऱ्या जॅकी श्रॉफला देखील इन्टीमेटेड सीन्स करतांना लाजल्यासारखं होत असल्याची स्पष्ट कबूली दिली.
सर्वांसमोर शुटींग असल्याने आपल्याकडेच लक्ष असल्याने असं वाटल्याचं ही व्यक्त केले. त्यांचा ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६\ ११’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते चित्रपटात इंटिमेट सीन देखील देताना दिसणार आहेत. ‘इंटिमेट सीन्स सर्वांसमोर शूट करताना मला लाज वाटत होती. जेव्हा मी असे सीन्स करतो तेव्हा मला प्रचंड भीतीदेखील वाटते. पण एक अभिनेता म्हणून मला हे करावे लागते’ ही असे जॅकी श्रॉफ यांनी सांगीतलेले होते.
कॅमेरावर अनेकजण पाहात असतात. दिग्दर्शक, असिस्टंट, क्रू आणि संपूर्ण जग पाहात असते. सर्वांसमोर असे सीन शूट करताना थोडी लाज वाटते पण तुमच्या कामाचा हा भाग असल्यामुळे तुम्हाला ते करावे लागते. ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६\ ११’ या चित्रपटात जॅकी श्रॉफ एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारनेच उत्सवांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले,’ आता मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का?
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘भाजपने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावं’; सतेज पाटलांचा खोचक सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

