लातूर: शासनाच्या योजना जुन्याच असल्या तरी त्याची अंमलबजावणी संपूर्ण मतदारसंघात संघटितपणे करण्याचा प्रयत्न करू, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले आहे. माणारेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन तेथील गावकऱ्यांशी तसेच शेतकाऱ्यांशी संवाद आज दिनांक ४ जून रोजी आ. पवार यांनी साधला आहे. शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त भागीदारीतून शेतकरी तसेच ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल निर्माण करू, असे आवाहन देखील यावेळी पवारांनी शेतकाऱ्यांशी बोलताना केले.
कोरोनाच्या परिस्थितीत इतर अनेक सामाजिक विषयांकडे दुर्लक्ष होत आहे असे सध्याचे चित्र झाले आहे, मात्र जिल्ह्यात गावपातळीवर जाऊन शेतकरी बांधवांशी आ. अभिमन्यू पवार हे संवाद साधत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे तसेच शेतकऱ्यांवर देखील मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्याच सोबत गावातल्या विकासकामे देखील रखडले आहेत अथवा दुर्लक्ष तरी होत आहेत. मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आज तांबरवाडी, केंगलवाडी व किनिनवरे या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी शुक्रवारी आ. पवारांनी संवाद साधला.
शासनाच्या योजना जुन्याच आहेत पण त्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण मतदारसंघात संघटितपणे करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त भागीदारीतून शेतकरी हिताचे व ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल निर्माण करु, असे आवाहन यावेळी पवारांनी शेतकरी बांधवांना केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, रोहयो एपीओ, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर दबाब टाकू नये’, आ.अंबादास दानवेंचा खा.जलील यांना सल्ला
- ‘काँग्रेसचे मंत्री लाचार झालेत, ते काका-पुतण्यांसमोर माना डोलावतात’
- ‘काँग्रेसनेच अण्णासाहेब पाटील यांची हत्या केली’, आ.मेटेंचा खळबळजनक आरोप
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

