Share

‘लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर दबाब टाकू नये’, आ.अंबादास दानवेंचा खा.जलील यांना सल्ला

Published On: 

औरंगाबाद : सील केलेल्या दुकानांवरील कारवाई तातडीने मागे घ्यावी या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना अरेरावी केली होती. तसेच महिला पोलिसाशी असभ्य वागल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी ‘कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांची पाठराखण करणे लोकप्रतिनिधींसाठी अशोभनीय आहे’ अशी टीका केली होती.

त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनीही खा.जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात लोकप्रतिनीधींनी प्रशासकिय अधिकाऱ्यांवर दबाब आणण्याचा प्रयत्न करू नये. राजकारण न करता समन्वय साधून कोरोना संसर्गाला आळा घातला पाहिजे’ असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, ‘जलील यांचे हे वर्तन जिल्ह्याच्या खासदाराला शोभत नाही याउलट पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, डॉक्टर्स व सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाला काही प्रमाणात आळा बसला आहे हे विसरून चालणार नाही. अशावेळी राजकारण न करता या सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी किंवा अधिकाऱ्यांशी संघर्ष न करता समन्वय साधून योग्य रीतीने कार्य करण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे.

खा.जलील यांचे देसाईंना प्रत्युत्तर
राज्यात एक आणि जिल्ह्यात वेगळाच नियम लावून दहशत निर्माण करणाऱ्या, हुकूमशाही गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणे हे पालकमंत्री सुभाष देसाई यांना शोभत नाही, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन कितीही गुन्हे दाखल केले तरी संकटसमयी सामान्य माणूस, व्यापारी कुणीही असला तरी त्याला मदत करण्याचे काम मी सुरूच ठेवले, असेही इम्तियाज यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!