मुंबई : काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात सोनिया गांधींकडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे मंत्री हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यामुळे ते काका आणि पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देणार असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सत्तेचे व्यसन लागल्याने काँग्रेसचे मंत्री लाचार झाले आहेत. त्यामुळे ते काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करतात. खरंतर, राज्यात एकीकडे करोना आणि दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नसल्यामुळे तातडीने यावर हालचाली करून कोणतंही पाऊल उचलले जात नाहीये असा आरोप त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी धनगर आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. ‘राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. मात्र, आता बहुजन समाज जागा झाला आहे. आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊच. वेळीच जागे व्हा अन्यथा धनगर समाजाने मुंबईला वेढा दिला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल’ असा इशारा पडळकर यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसनेच अण्णासाहेब पाटील यांची हत्या केली’, आ.मेटेंचा खळबळजनक आरोप
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

