Share

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली : जावडेकर

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना समजलाच नाही असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत करोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला नौटंकी वगैरे शब्द वापरुन देशाच्या जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणतात, आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी जनतेनं कधीच बंद केली आहे असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!