मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेचा कडक समाचार घेतला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी सांगितले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत.
उद्धव ठाकरेंचे सूडबुद्धीचे राजकारण-
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकाना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Russia | पुतीन यांच्या घोषणेनं दहशत! नागरीकांची देश सोडण्याची गडबड तर फ्लाईट्स देखील बंद
- Maja Ma Trailer | ‘मजा मा’ चित्रपटात बॉलीवुडची धक धक गर्ल झळकणार एका वेगळ्या अंदाजात,पहा ट्रेलर!
- BJP । “हिंमतीची भाषा करायची असेल तर आदित्य ठाकरेंनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीचा सामना करावा”
- Sudhir Mungantiwar | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी‘ सुरू करण्यात येणार – सुधीर मुनगंटीवार
- TVS Sports Bike | उत्तम मायलेज असलेल्या TVS Sports बाईक वर आहे विशेष ऑफर, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

