Share

Maja Ma Trailer | ‘मजा मा’ चित्रपटात बॉलीवुडची धक धक गर्ल झळकणार एका वेगळ्या अंदाजात,पहा ट्रेलर!

Published On: 

🕒 1 min read

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्याने लाखो लोकांना वेड लावले आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्या नृत्याचे दिवाने होतात. त्याच वेळी, तिच्या आगामी ‘मजा मा’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा सर्वांवर जादू करण्यासाठी तयार आहे. चित्रपटाचा ट्रेलर (मजा मा ट्रेलर) रिलीज झाला आहे.

‘मजा मा’ चा ट्रेलर रिलीज

माधुरी दीक्षित चा प्राइम व्हिडिओ वरचा आगामी चित्रपट ‘मजा मा’ चा ट्रेलर 22 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून कळत आहे की या चित्रपटात माधुरीचा वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती पल्लवी या जटिल, निडर, आनंदी आणि परिपूर्ण मध्यमवर्गीय महिलेची भूमिका साकारत आहे, जी तिच्या नृत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या कौटुंबिक जीवनात अशांतता येते जेव्हा तिचा मुलगा तेजस एका श्रीमंत एनआरआय मुलीशी लग्न करत असताना पल्लवीबद्दलची अफवा उडते, ज्यामुळे तेजसचे लग्न थांबते. आता या अडचणींचा पल्लवी कसा सामना करेल हे पाहायचे आहे.

चित्रपटातील बाकी कलाकार 

माधुरी दीक्षित व्यतिरिक्त या चित्रपटात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चढ्ढा असे अनेक कलाकार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

माधुरी दीक्षितचा ‘मजा मा’’ हा चित्रपट एक जबरदस्त कौटुंबिक आणि मनोरंजनाने भरलेला चित्रपट असणार आहे. हा चित्रपट भारतातील पहिला Amazon Original चित्रपट आहे, जो 6 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!