🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार आणि प्रशासन घेत असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं जात आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोना स्थिती ही आटोक्यात येत असून निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत.
आज राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार कोरोनाची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही अद्यापही अधिक आहे.
आज रोजी नंदूरबार जिल्हयात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही. राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे. तर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग असल्याचे जाहीर करण्यात आल आहे.
सध्या राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर २.४४ टक्के इतका आहे. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा जे शरद पवार तलाक बद्दल म्हणाले होते, तेच तालिबानी शरियाबद्दल सांगतायत’
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- अनिल देशमुखांची चौकशीला पुन्हा एकदा दांडी; ईडी कठोर पाऊल उचलणार ?
- EPFOच्या कार्यालयात मोठा स्कॅम; अधिकाऱ्यानींच लंपास केले 21 कोटी रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
