Share

राष्ट्रवादीला धक्का, पवारांनी जाहीर केलेला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे नमिता मुंदडा यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवारी असतानाही नमिता मुंदडा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नमिता मुंदडा या गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. कारण उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना ‘उमेदवार फुटण्याच्या भीतीने राष्ट्रवादीने बीडमधील उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला होता म्हणजे त्यांचा रोख हा नमिता मुंदडा यांच्याकडे होता. भाजपमध्ये प्रवेश करण्या पूर्वी त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, पक्षांतरामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. त्यात वैभव पिचड, उदयनराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178553187206172672?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178552743738298370?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178544737348812800?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!