Share

पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोलेंनी ‘ते’ वक्तव्य केले-संजय कुटे

Published On: 

बुलढाणा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण होत आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुस्लीम आणि हिंदू वाद निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. आता यावरूनच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे हिंदू मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. आता आपण सत्तेत येणार नाही या भीतीपोटी काँग्रेसकडून हिंदू मुस्लीम वाद सुरू करण्यात येत असल्याचा आरोप संजय कुटे यांनी केला आहे. तसेच त्यांचे हे वक्तव्य राज्याला न शोभणारे आहे. अशी प्रतिक्रिया संजय कुटे यांनी दिली आहे. ते बुलढाणा येथे सुरु असलेल्या भाजपाच्या निवासी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी भाजप मूळ प्रश्नांवर काम करत नाही तर कधी सावरकर आणतील, कधी वल्लभभाई आणतील. असे करत त्यांना आम्हाला नागरिक शास्त्र शिकवायची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुस्लीम आणि हिंदू वाद निर्माण केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!