नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशाला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. मोदींची आज ८२ वी ‘मन की बात’ कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आज ते काय संवाद साधतील याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यामुळे आज पुन्हा पंतप्रधान मोदी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर जगभरातून भारताचे कौतुक केले जात आहे.
तर दुसरीकडे कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- ‘जीआरमध्ये ‘संभाजीनगर’ नाव आलंय, लवकरच घोषणाही होईल’, संजय राऊतांचा दावा
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
