Share

बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला

Published On: 

नाशिक : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.  शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी आशिष शेलारांच्या टीकेला चोख उत्तर दिलं आहे.

‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष आहोत आम्हाला कसं काय कुणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, पळून नाही गेलो. तुम्हीच पळून गेलात. काश्मिर खोऱ्यात जे हिंदुंचं हत्याकांड सुरु आहे. बांग्लादेशात जे हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्या हिंदुंना संरक्षण देण्याबाबत आजच्या सामनातील अग्रलेखात प्रश्न उपस्थित केलाय’, असं राऊत म्हणाले आहेत.

‘देशाबाहेरील हिंदू असेल किंवा काश्मिरमधील हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे, असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं तर कुणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतोय हिंदुंचं रक्षण करा, आम्ही म्हणतोय बांग्लादेशातील हिंदुंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांग्लादेशवर दबाव आणला पाहिजे.

भाजपचे खासदार स्वामी असं म्हणतात कि हिंदुस्तानने हिंदुंच्या विषयावर बांगलादेशशी युद्ध केलं पाहिजे, मग यावर मिस्टर शेलार काय म्हणतात? काश्मिर खोऱ्यात मागील 17 दिवसांत हिंदू आणि शिखांच्या एकूण 21 हत्या झाल्या. तर 19 पोलिस आणि जवान मारले गेले आहेत. मग हा प्रश्न विचारणं हे दारिद्र्य झालं का?’ असा सवालही राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!