मुंबई : आज आमिर ५६ वर्षांचा झाला पण त्याची सध्याची त्याची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता तो फार पुढे आहे. ‘गजनी’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं १०० कोटींच्या घरात प्रवेश केला आणि तिथे टिकून राहिला. परिस्थिती तर अशी आहे की, जर आज आमिरच्या चित्रपटाने ३०० कोटी कमवले नाहीत तर त्या चित्रपटाला फ्लॉप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
एवढंच काय, ‘चीनची भिंत’ सर करणारा तो पहिलाच बॉलीवूडकर. ‘थ्री इडियट्स’, ‘दंगल’ या त्याच्या चित्रपटांनी ‘चिनी ड्रॅगन’लाही भुरळ पाडली. त्याच्या चित्रपटांनी चीनची थिएटर्स आणि मार्केट दोन्ही काबिज केलं. आमिर खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
१९७३ साली आलेल्या ‘यादों की बारात’ ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या ‘सत्यमेव जयते’ ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंचे अमित शहांना पत्र !
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, निलेश राणेंची मागणी
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
