Share

‘फ्रंटलाईन वॉरियर्सचे आभार; लसीकरणाचा हा टप्पा यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत ‘

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 16 जानेवारी 2021 पासून आज भारतात सर्वात मोठा लसीकरण ड्राइव्ह सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हॅक्सिन मोहिमेला सुरुवात केली.

किमान दोनवेळा डोस घेणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचवेळी सगळ्यांनी यापुढेही खबरदारीचा उपाय करणे गरजेचे आहे. कोणीही याबाबत विसरू नये. मास्क लावणे आणि साबणाने हात धुणे गरजेचे आहे हे देखील मोदी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सचिनने केले आहे आणि एकत्रितपणे ही लढाई जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले आहे ?

”कोविड-19 विरुद्ध लढत असलेली लढाई इंडियाच्या शेवटच्या कसोटी सामन्यासारखी आहे. यात खूप चढउतार दिसून आले. परंतु, आपल्या फ्रंटलाईन वॉरियर्सनी खूप धैर्याने संकटाचा सामना करत आपल्या देशाला पडण्यापासून वाचवले.”

”आम्ही सर्व फ्रंटलाईन वॉरियर्सचे आभारी आहोत आणि लसीकरणाचा हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे आपण नियमित काळजी घेणे गरजेचे आहे.”

”लसीकरणामध्ये सुद्धा मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये आपण एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. आपण सर्वांनी एकत्रितरीत्या टीम सारखे लढू आणि कोविड-19 वर विजय मिळवू.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!