Share

लॉकडाऊनचा परिणाम, औरंगाबादेत अपघात २८ टक्क्यांनी कमी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. पर्यायाने अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाल्याची आकडेवारी आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन होता. रस्त्यावर वाहतूक कमी झाल्याने अपघातांचे प्रमाणही घटले. मृत्यूचे प्रमाण ३२ टक्क्यांनी, तर जखमी होण्याचे प्रमाणही ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे.

वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला होता. राज्यात सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढल्याने त्यात दररोज अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येत होती. याच परिस्थितीला औरंगाबादला सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांहून अधिक झाली आहे. दर महिन्याला सरासरी ८ हजार, तर दररोज २५१ वाहने रस्त्यावर येत आहेत. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघात होतात.

२०१९ मध्ये वाढलेले अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन राज्य रस्ता सुरक्षा समितीने तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरटीओ कार्यालय, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून अपघातांचे प्रमाण घटल्याने आकडेवारीवरून समोर आले.

अपघातांचे प्रमाण – २०१९, एकूण अपघात – ५६०, एकूण मृत्यू -१९९, एकूण जखमी -४३४

अपघातांचे प्रमाण २०२०, एकूण अपघात – ४०६, एकूण मृत्यू -१३६, एकूण जखमी – २९४

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!