🕒 1 min read
मुंबई : हायकोर्टाने OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“मागील १ वर्षापासून महाविकास आघाडीचे नेते केवळ एकमेकांची नाराजी दूर करण्यात गुंग होते. भाजपावर टीका हा एककलमी कार्यक्रम आखला. परंतु राजकारणाच्या नादात सरकार चालवण्याचं भान मविआ नेत्यांना राहिलं नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा केल्याने आज सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची नाचक्की झाली.”, असा टोला keshav उपाध्ये यांनी लगावला आहे.
#ओबीसींची_फसवणूक
मागील १ वर्षापासून महाविकास आघाडीचे नेते केवळ एकमेकांची नाराजी दूर करण्यात गुंग होते. भाजपावर टीका हा एककलमी कार्यक्रम आखला. परंतु राजकारणाच्या नादात सरकार चालवण्याचं भान मविआ नेत्यांना राहिलं नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा केल्याने आज 1/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 4, 2022
तसेच राज्य सरकारनं जाणूनबुजून ओबीसी बांधवांची फसवणूक केली. आता ओबीसीविना राज्यात निवडणुका होणार असल्याने राज्य सरकारनं ओबीसींची राजकीय हत्याच केल्याचं दिसून येते. राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्व संपुष्टात येण्याची भीती आहे. अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयामुळे OBC आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. राज्यात साधारण १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या २०२० च्या प्रभागरचनेनुसार घेण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; देवेंद्र फडणवीस
- OBC Reservation : हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्य सरकारला दिला ‘हा’ आदेश
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचं सोडा, ‘या’ भारतीय बॉलरनं मारला होता १२४ मीटरचा लांब षटकार!
- “मुस्लिमांनी धार्मिक वळण दिल्यास, आम्हीही धार्मिक वळण देऊ” ; राज ठाकरे
- “राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या व्हिडिओचा दाखला देत नव्याने राजकारण तापविले”, छगन भुजबळांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
