पुणे : पुणे शहरातील निर्बंध कमी करण्यात आले असले तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक ठेवण्यास प्रशासन कटाक्षाने काम करत आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी पुण्यात सध्या १५० ते २०० हुन अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोना मुक्तांचे प्रमाण देखील कमी जास्त होत असून कोरोनाचा धोका हा कायम आहे.
दरम्यान, आज पुणे शहरात नव्याने १८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९१ हजार ४४४ इतकी झाली आहे. तर २१६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८० हजार ४२४ झाली आहे.
आज एकाच दिवसात ९ हजार ६६८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ४५ हजार ८९१ इतकी झाली आहे. यासोबतच, सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार १४६ रुग्णांपैकी २०८ रुग्ण गंभीर तर २५८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८७४ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस पुढे गुडघे टेकून शिवसेनेनं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’; भाजपची जहरी टीका
- ठाकरे, पवार यांच्यासह १९ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींची महत्वाची बैठक
- ‘भाजपच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेलाय’; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- ‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस ; पवारांसारख्या शक्तीस्थळावर हल्ला करताच आपोआप प्रसिद्धी मिळते’
- ‘आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका’; राज ठाकरेंच रोखठोक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

